आठवतं शाळेमध्ये बालभारतीच्या पुस्तकांमधील गोष्टी..किती छान वाटायचं जेव्हा ती गोष्ट वाचताना किंवा ऐकताना स्वप्न रंगावायचो आपण..नाचणारे मोर,कापसासारखा असणारा ससा, मडके भरणाऱ्या सरी, पाऊसातल्या कागदी होड्या,याशिवाय डोंगराच्या पायथ्याला घर घराभोवती हिरवाई,विविध पक्षी,फळे,फुले आणि बाजूनेच संथ वाहणारी नदी, निळे शुभ्र असणारे स्वच्छंदी आकाश..आपली शाळा सुटते तशी पाखरांची शाळा ही सुटते असंच आपण आजही समजतो..चित्र रेखाटन करताना देखील निसर्गाचं हेच चित्र रंगवायचो..आणि मामाच्या गावी जाणाऱ्या झुक झुक गाडीचा प्रवास, प्राण्यांविषयीचं आणि निसर्गाविषयीचं प्रेम, संगोपन या आणि कितीतरी निसर्गाच्या गोष्टी ऐकून आपण कल्पनेचे बांध उराशी बांधून मोठे होत जातो..गांडूळ हा शेतकऱ्यांचा मित्र असं समजणारे आपण आता गांडूळाची जागा रासायनिक खतांनी सर्रास घेतलेली आपण बघतो..आणि मग हळू हळू मोठं होताना जाणवतं की अरे आपण विचार केला तसा निसर्ग तर कुठे दिसतच नाही..हाती येते ती निराशा..कदाचित मग हे निराशेचे ओझे पेलवतच आपण निसर्गाच्या हानीचे याची देही याची डोळा साक्षीदार होतो..
भरभरून देतो ,सावरतो, सुखावतो,सांभाळतो,निरपेक्ष प्रेम करतो,सावली देतो,सुख दुःखाचा सोबती होतो , अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजांची पूर्तता करतो,शुद्धता,ताजेपणा,३ ऋतूंचा वाटेकरी हे सगळं आपल्याला निस्वार्थाने देतो तो म्हणजे निसर्ग..
आणि आपण काय देतो?? वृक्षतोड,कचरा, अशुद्ध हवा, मुक्या प्राण्यांची हिंसात्मक हत्या आणि कितीतरी शिकारी, काँक्रिटचे जंगलं, निसर्गाचं बाजारीकरण, रासायनिक खतांचा बेसुमार वापर..
निसर्ग काय सांगू इच्छितो ते ऐकूया..कारण त्याचं जतन आणि संवर्धन हे आपल्याच हातात आहे.
- प्राची 🎀
#जागतिकपर्यावरणदिन 🕊️
#canonphotography
No comments:
Post a Comment