प्रत्येक स्त्री ही आपल्या आयुष्यात खूप संकटाना पार करीत असते. प्रत्येकीचे आयुष्यत येणारे संकट वेगळवेगळी असतात.काही जिद्दीने लढतात,काही प्रतिकार करतात,काही सहन करतात,तर काही हार मानतात. समाजात स्त्री ला दुय्यम स्थान दिले आहे ..आणि याची उदाहरणं जेवढी देऊ तेवढी कमीच त्यातली ही स्त्री, जे नशिबी भोग आले आहे ते स्वीकारून आपले आयुष्य जगणारी..ही कविता त्या स्त्रियांना समर्पित ज्या आयुष्य हे फक्त तडजोडीवर निभवत आहेत.
ही "ती" ची कहाणी,
का आले असावे तिच्या नयनी पाणी ??
मृगजळाच्या गोष्टींवर विश्वास ठेवणारी ती,
धास्तावलेली खूप काही मिळवण्यासाठी,
भूतकाळाच्या पाऊलखुणा दूर सारून,
वर्तमानाच्या जबाबदारीचा कडेवर लादून,
भविष्याच्या उमेदीच्या सांगड घालून,
राखीव आयुष्याकडे एक पाऊल टाकून,
मायेच्या उंबरठ्यापलीकडे हद्दपार झालेली,
ही "ती" ची कहाणी खरंच का आले असावे तिच्या नयनी पाणी??

एक जाणीव मनात घेऊन,
एकदा मोडलेला पत्त्यांचा डाव,
पुन्हा रचण्यास ती सज्ज,
नवा जोश,नवी उमेद,नवे स्वप्न,
यात गुंफलेलं एक नवीन नातं,
होती मृगजळाची ही शर्यत जिंकायची,
मात्र हे सारं करताना ती स्वतःला विसरायची,
ही "ती" ची कहाणी,खरंच का आले असावे तिच्या नयनी पाणी?

तिची कहाणी इथेच थांबली नाही,
अशातच तिच्या सुखाच्या बहरत होत्या रात्री कितीक,
मात्र दुःखाच्या बिथरत होत्या अगणितिक,
विश्वासाचे बांध कोमेजून,
शरीरावर खुना उमटवून तो निर्धास्तपनाने मिरवून समाजात या वावरत होता,
मात्र प्रेमाने तिला कधीही सावरत नव्हता,
ही "ती"ची कहाणी,खरंच का आले असावे तिच्या नयनी पाणी?

मृगजळाची कहाणी संपली होती
मागे तडजोड उरली होती,
ऐकून तिची ही कहाणी,
तिच्या सोबत माझ्याही नयनी पाणी..
मागे तडजोड उरली होती,
ऐकून तिची ही कहाणी,
तिच्या सोबत माझ्याही नयनी पाणी..
स्वतःला दोष देत ती म्हणाली,
दुभंगी आयुष्य नशिबी आले, दोष कुणाला का मी द्यावे?
सांगतात का उगाच थोरले मोठे,
ठेविले अनंते तैसेचि रहावे..!!
दुभंगी आयुष्य नशिबी आले, दोष कुणाला का मी द्यावे?
सांगतात का उगाच थोरले मोठे,
ठेविले अनंते तैसेचि रहावे..!!
By:- Prachi Zade